राज्यातील केवळ सात नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत किंचित सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 05:26 AM2020-11-02T05:26:59+5:302020-11-02T05:27:19+5:30
rivers : राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली असलेल्या १९ पैकी सात नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता किंचित सुधारली आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई: लॉकडाऊनच्या काळात नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याचा आशावाद व्यक्त केला जात होता. प्रत्यक्षातील चित्र मात्र उलट असून, देशभरातील गंगा नदीसह व्यास,
चंबल, सतलज, स्वर्णरेखा या प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत फारसा फरक पडलेला नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यास दुजोरा दिला आहे.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली असलेल्या १९ पैकी सात नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता किंचित सुधारली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, व्यास, ब्रह्मपुत्रा, वैतरणी, ब्राह्मणी, कावेरी, चंबल, घग्गर, महानदी, माही, पेन्नार, साबरमती, सतलज, स्वर्णरेखा आणि तापी नदीच्या पाण्याची गुणवत्ता मोजण्यात आली.
मिठीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारणार
मिठीच्या बायोफायटो रेमेडीयेशन प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. याअंतर्गत नदीमधील तरंगत्या कचऱ्याचा पुनर्वापर केला जाईल. बायोमेरेडिएशन आणि फायटोरेमेडिएशन यांचा वापर करून मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारली जाईल. याद्वारे समुद्रात नदीत प्रवेश करणारे प्लास्टिक आणि तरंगणारा कचरा थांबविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरविले जाईल.
- लॉकडाऊनपूर्वी आणि नंतर बैतरनी, महानदी, नर्मदा आणि पेन्नर या नदींचे पाणी आंघोळीसाठी योग्य मानले गेले. ब्राह्मणी, ब्रह्मपुत्रा, कावेरी, गोदावरी, कृष्णा, तापी, यमुनेच्या पाण्यात किंचित सुधारणा झाली.
इच्छाशक्ती गरजेची
सरकारची इच्छा असेल तरच भारतातल्या नद्या स्वच्छ होतील. दुसरे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे नद्यांमध्ये प्रदूषित पाणी कमी गेले. त्यामुळे त्या स्वच्छ होत्या. आता पुन्हा सर्व व्यवहार सुरू झाल्याने नद्या पुन्हा प्रदूषित झाल्या आणि हे सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज नाही.
- डॉ. राजेंद्र सिंह (जलपुरुष)