Join us

मुंबईत दैनंदिन काेराेना रुग्णांमध्ये किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेले काही दिवस ५०० च्या आसपास काेराेनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेले काही दिवस ५०० च्या आसपास काेराेनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारी ८६३ नवे रुग्ण आढळून आले. तसेच रोज १० पेक्षा कमी मृत्यू होत होते. त्यात बुधवारी वाढ झाली आहे. दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो ७२८ दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख २३ हजार ३२४ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १५,३३८ झाला आहे. मागील २४ तासांत ७११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ९१ हजार १२८ वर पोहोचली आहे. सध्या १४ हजार ५७७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १२ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.