‘नो बेल, ओन्ली जेल’चा नारा; वरियमसिंगसह वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:04 AM2019-10-10T00:04:59+5:302019-10-10T00:05:24+5:30

सिंगसह वाधवांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात आणणार असल्याचे समजताच, पीएमसी बँक खातेधारकांनी कोर्टाबाहेरच तळ ठोकला.

 Slogan 'No Bell, Only Prison'; Enlargement of Wadhwa father-son cell with Variam Singh | ‘नो बेल, ओन्ली जेल’चा नारा; वरियमसिंगसह वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

‘नो बेल, ओन्ली जेल’चा नारा; वरियमसिंगसह वाधवा पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

googlenewsNext

मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र को. आॅप. बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांच्यासह एचडीआयएलचे राकेश, सारंग वाधवा पिता-पुत्रांच्या कोठडीत बुधवारी १४ तारखेपर्र्यंत वाढ करण्यात आली.
सिंगसह वाधवांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात आणणार असल्याचे समजताच, पीएमसी बँक खातेधारकांनी कोर्टाबाहेरच तळ ठोकला. राकेश, सारंग वाधवा यांचे वकील अमित देसाई यांची कार येताच खातेदारांनी त्यांच्या कारसमोर आंदोलन केले. गाडीवर लाथा मारल्या. पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध केला. बँकेच्या संतप्त ग्राहकांनी ‘वरियम सिंग चोर है, पीएमसी बँक चोर है आणि आरबीआय चोर है,’ अशा घोषणा देत रास्तारोको केला. आरोपींना जामीन मिळू नये, अशी मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत वाहतूक सेवा पूर्ववत केली.
यावेळी आर्थिक गुन्हे शाखेने अटक आरोपींनी घोटाळ्यातील पैसे कसे व कुठे फिरविले? त्यांची समोरासमोर चौकशी करणे बाकी आहे, काही कागदपत्रे सापडली असून, त्याची शहानिशा करायची असल्याने वाढीव कोठडी मागितली. त्यानुसार, न्यायालयाने तिघांच्या कोठडीत १४ तारखेपर्यंत वाढ केली. अटकेतील व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. चौघांची एकत्रित चौकशी होईल. २०१२ मध्ये एचडीआयएलने थकविलेल्या कर्ज खात्यांची परिस्थिती बिघडल्यावर जॉयने कंपनीला काही मालमत्ता तारण ठेवण्यास भाग पाडले. त्याचे मूल्यांकन न करताच त्या ३,५०० कोटींच्या आहेत, अशी नोंद केली होती. आता या मालमत्तांचे आर्थिक गुन्हे विभाग मूल्यांकन होईल.

Web Title:  Slogan 'No Bell, Only Prison'; Enlargement of Wadhwa father-son cell with Variam Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.