Join us

Slum Rehabilitation Authority: मुख्यमंत्र्यांचा दोन लाख 'झोपु' घरांचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 9:54 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत झोपडीवासीयांना दोन लाख घरे उपलब्ध करू देण्याचा संकल्प सोडला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी येत्या तीन वर्षांत झोपडीवासीयांना दोन लाख घरे उपलब्ध करू देण्याचा संकल्प सोडला आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कंबर कसली असून संकल्पपूर्ततेसाठी सर्व प्राधिकरणांच्या सहकार्याने शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले आहे. 

याचाच एक भाग म्हणून, घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या पुनर्विकासाला एमएमआरडीएने प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. या योजनेसाठी लागणारा निधी एमएमआरडीए उपलब्ध करून देणार आहे. यामुळे १४ हजार ४५४ झोपड्यांचे पुनर्वसन होणार असून एमएमआरडीएला पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरणासाठी मोफत भूखंड मिळणार आहे. पालिका म्हाडाच्या भूखंडावर झोपडपट्ट्या असून त्यांचाही पुनर्विकास झाला तर त्यातूनही अतिरिक्त घरे निर्माण होणार आहेत. झोपु प्राधिकरणाचाही पुढाकार घेऊन योजना पूर्ण करण्यासाठी खुल्या निविदा जारी करणार आहे. त्यातूनही हजारो घरे प्राधिकरणाला उपलब्ध होणार आहेत.

"रखडलेल्या योजनांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु. नि. व. पु) अधिनियम १९७१ च्या कलम १३ (२) अन्वये विकासकाविरुद्ध कारवाई करून अशा रखलेल्या योजना निवदा प्रक्रियेने विकासकाची नेमणूक करून पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. या अनुषंगाने जाहीर सूचनेद्वारे इच्छुक विकासकाकडून अर्ज मागवून तांत्रिक व वित्तीय निकषांवर विकासकांची नामिका सूची (Empanelment of developers) तयार करून त्यास शासनाची मान्यता घेण्यात आलेली आहे. त्यामुळे यापुढे काही रखडलेल्या योजनासुद्धा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्तरावर राबविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

...........

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईच्या वेबसाईटला भेट द्याः http://sra.gov.in/

टॅग्स :झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण