CoronaVirus News: झोपडपट्टीत आटोक्यात, इमारतींमध्ये थैमान, नियोजनासाठी महापालिकेची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:13 AM2020-08-18T02:13:50+5:302020-08-18T02:13:59+5:30

या वस्ती दाटीवाटीने वसलेल्या असल्याने अशा परिसरात सोशल डिस्टन्सिंग अवघड ठरत होते.

In the slums, in the buildings, in the buildings, in the rush of the Municipal Corporation for planning | CoronaVirus News: झोपडपट्टीत आटोक्यात, इमारतींमध्ये थैमान, नियोजनासाठी महापालिकेची धावपळ

CoronaVirus News: झोपडपट्टीत आटोक्यात, इमारतींमध्ये थैमान, नियोजनासाठी महापालिकेची धावपळ

Next

मुंबई : झोपडपट्ट्यांमध्ये शिरकाव करणाऱ्या कोरोनाला ‘चेस द वायरस’ मोहिमेद्वारे महापालिकेने पळवून लावले. लॉकडाऊन खुले होत असल्याने इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मलबार हिल, पेडर रोड, बोरीवली अशा विभागांमधील उत्तुंग इमारतींमध्ये रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. त्यामुळे आता इमारतींमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू आहे.
मुंबईतील वरळी, धारावी, कुर्ला, भायखळा या हॉटस्पॉटमध्ये विशेषत: झोपडपट्टी विभागात कोरोनाचा प्रसार रोखणे महापालिकेसाठी मोठे आव्हानात्मक ठरले होते. या वस्ती दाटीवाटीने वसलेल्या असल्याने अशा परिसरात सोशल डिस्टन्सिंग अवघड ठरत होते.
मात्र जास्तीत जास्त लोकांची तपासणी, संस्थात्मक विलगीकरण, तत्काळ निदान, योग्य उपचार अशी मोहीम राबवत महापालिकेने झोपडपट्टी विभागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला.
एकीकडे झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असताना उत्तुंग इमारतींमध्ये बाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.
पश्चिम उपनगरात दररोज सापडणाºया बाधित रुग्णांमध्ये ७० टक्के इमारतींमध्ये राहणारे असल्याचे दिसून आले आहे.
एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा प्रसार झोपडपट्ट्यांमध्ये सुरू असताना येथील रहिवाशांमध्ये या रोगाशी लढण्याची शक्ती निर्माण झाली आहे. मात्र इमारतींमधील रहिवासी गेले पाच महिने घराबाहेर पडलेच नाहीत. अ‍ॅनलॉकमुळे आता घराबाहेर पडल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
>येथे वाढत आहेत रुग्ण....
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ८६ दिवसांवर पोहोचला आहे.
तसेच दैनंदिन रुग्ण वाढ ०.८१ टक्के आहे. मात्र उत्तुंग इमारती असलेल्या मलबार हिल, पेडर रोड, वाळकेश्वर, केम्स कॉर्नर आणि महालक्ष्मी या भागांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढ ़०.३४ टक्के आहे.
तसेच कांदिवली बोरवली मालाड गोरेगाव मुलुंड या भागांमध्ये दैनंदिन रुग्ण वाढीचे प्रमाण मुंबईतील दैनंदिन वाढ पेक्षा अधिक आहे.
जी उत्तर विभागात धारावी या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमधील कोरोना विरुद्ध लढ्याने मुंबईच नव्हे तर संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र दादर, शिवाजी पार्क येथील इमारतींमध्ये रुग्ण संख्या वाढत असल्याने जी उत्तर विभागातील दैनंदिन रुग्ण वाढ ०.७२ टक्के आहे.
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत असल्याने दुकान, व्यापारी संकुल, मॉल सुरू करण्यात आले. मात्र जलतरण तलावामुळे कोरोना पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे जलतरण तलाव सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Web Title: In the slums, in the buildings, in the buildings, in the rush of the Municipal Corporation for planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.