मुंबई : ‘स्वच्छ शौचालय, स्वच्छ हात, स्वच्छ पाणी’ निरोगी राखण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात, हे समजवण्यासाठी स्वत: निरोगी राहायला हवे. अशा प्रकारे आयुष्यातील छोटे बदल, मोठा परिणाम घडवू शकतात,’ असा मोलाचा सल्ला अभिनेत्री काजोल देवगण हिने देशवासीयांना दिला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या प्लेयिंग बिलियन भारतासाठी ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ या नव्या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी बुधवारी आयोजित कार्यक्रमात काजोल बोलत होती. ‘लोकमत’ या उपक्रमाचे मीडिया पार्टनर आहे.काजोल या मोहिमेची ‘अॅडव्होकसी अॅम्बेसिडर’ आहे. तिन सांगितले की, आई म्हणून स्वत:च्या मुलांना स्वच्छतेचे धडे मी देत असते. माझ्या कुटुंबीयांकडून स्वच्छतेचे धडे मला मिळाले. तसे प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठांकडून लहानपणापासूनच जेवणाआधी, शौचास जाऊन आल्यावर किंवा काहीही खाण्याआधी हात धुण्यास सांगितले जाते. तीच संस्कृती आपण पुढे घेऊन जात आहोत. मात्र त्या वेळच्या मातीत, पाण्यात, हवेत बदल झाला आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करायला हवेत. तरच या समस्येला तोंड देता येईल, असेही काजोल म्हणाली.‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ हा केवळ उपक्रम नसून ती एक चळवळ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मत हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे (एचयूएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, देशातील सर्व कॉर्पोरेट्सला एकत्रितपणे या चळवळीचा भाग होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. जाहिरातींद्वारे लोकांच्या सवयी बदलण्याची ताकद कॉर्पोरेट्सकडे आहे. केंद्र सरकार व पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या मदतीसाठी एचयूएल स्वत:चे ज्ञान, कौशल्य पणाला लावेल असे त्यांनी स्पष्ट केले. अस्वच्छतेमुळे वारंवार आजारी पडणाºया चिमुरड्यांच्या वाढणाºया कुपोषणाचे प्रमाण, खुंटणारी वाढ यावरही त्यांनी प्रकाश टाकला.अभियानाचे प्रिंट पार्टनर असलेल्या ‘द हिंदू’, ‘हिंदुस्तान टाइम्स’ आणि ‘राजस्थान पत्रिका ग्रुप’ या माध्यमांतील वरिष्ठ अधिकाºयांनीही अभियानास शुभेच्छा दिल्या.अभियानाच्या शुभारंभी काजोलसह संजीव मेहता, ऋषी दर्डा आणि इतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वच्छतेच्या प्रसाराची शपथ घेतली. सोबतच अस्वच्छतेमुळे बालकांच्या हिरावणाºया आनंदावर आधारित एका लघुपटाचे अनावरण करण्यात आले. लघुपटात काम केलेल्या चिमुरड्यांना या वेळी गौरवण्यात आले.या चळवळीत ‘लोकमत’ला माध्यम प्रायोजक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. कुपोषणाशी दोन हात करताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ‘लोकमत’ कार्य करेल. ‘संस्काराचे मोती’ या ‘लोकमत’च्या उपक्रमातून हात धुणे, शौचालय स्वच्छ ठेवणे हा संदेश लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करू. तसेच ही चळवळ पुढे नेऊ.- ऋषी दर्डा, संपादकीय संचालक आणि साहाय्यक व्यवस्थापकीय संचालक, लोकमत मीडिया लिमिटेड
छोटा बदल, पण मोठा परिणाम घडविणे शक्य! हिंदुस्तान युनिलिव्हरचे ‘स्वच्छ आदत, स्वच्छ भारत’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 2:42 AM