Join us  

लहान घरांना करातून सूट!

By admin | Published: March 21, 2015 1:59 AM

भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीतून यापूर्वी वगळण्यात आलेल्या ५०० चौ़ फुटांखालील घरांना आणखी पाच वर्षे ही सूट मिळणार आहे़

मुंबई : भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीतून यापूर्वी वगळण्यात आलेल्या ५०० चौ़ फुटांखालील घरांना आणखी पाच वर्षे ही सूट मिळणार आहे़ मालमत्ता करामध्ये सरासरी १४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावावर पालिका महासभेत आज शिक्कामोर्तब करण्यात आले.हा महत्त्वपूर्ण निर्णय महासभेने घेतला़ त्यामुळे ८ लाख मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे़ ५०० चौ़ फुटांवरील मालमत्तांच्या दरामध्ये मात्र १ एप्रिल २०१५पासून ११़७४ टक्के वाढ होणार आहे़ हा प्रस्ताव पारित झाल्यामुळे तो आता राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१० पूर्वलक्षी प्रभावाने जागेच्या बाजारभावानुसार मालमत्ता कर लागू करण्यात आला आहे़ परंतु त्या वेळीस नवीन करप्रणालीतून वगळण्यात आलेल्या ५०० चौ़ फुटांखालील घरांच्या मालमत्ता करामध्ये ४० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला़ अंतिम मंजुरीसाठी पालिकेच्या महासभेपुढे प्रशासनाने आज हा प्रस्ताव आणला़मात्र ५०० चौ़ फुटांखालील घरांना २०१५ ते २०२० या पुढील पाच वर्षांसाठीही नवीन करप्रणालीतून सूट देण्यात यावी, अशी उपसूचना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी मांडली़ भाजपाची हीच मागणी असल्याने त्यांना शिवसेनेच्या उपसूचनेला समर्थन देणे भाग पडले़ विरोधी पक्षांनीही यास दुजोरा दिल्यामुळे अखेर या नवीन सुधारणेसह सुधारित मालमत्ता कराचा प्रस्ताव मंजूर झाला़ (प्रतिनिधी)कार्पेट एरियानुसार आकारणीच्निवासी कर -११़ ७४ टक्केच्व्यावसायिक कर -१८़२१ टक्केच्दुकाने व आस्थापना -९़४४ टक्केच्जमीन, औद्योगिक वसाहती - २६़०२%५०० चौ़ फुटांपर्यंतच्या निवासी वर्गातील एकूण १४,२२,८१२ पैकी ७,६०,०८४ करदात्यांवर कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही़ त्यामुळे करपात्र मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार (रेटीबल व्हॅल्यूने) मालमत्ता कर भरणाऱ्या गिरगाव, बीडीडी चाळ, काळबादेवी, मोहंमद अली रोड, भुलेश्वर यांना दिलासा मिळणार आहे़शिवसेनेने केला भाजपाचा गेमसुधारित मालमत्ता कर भरमसाठ वाढविणारे सूत्र रद्द करण्यास प्रशासनाला भाग पाडल्याचे श्रेय लाटणाऱ्या भाजपाची शिवसेनेने आज चांगलीच जिरवली़ ५०० चौ़ फुटांखाली घरांना आणखी पाच वर्षे करवाढीतून सूट देण्याचा प्रस्ताव मांडण्याची तयारी भाजपाने केली होती़ त्याआधीच ही उपसूचना पालिका महासभेत मांडून शिवसेनेने भाजपाचा चांगलाच गेम केला़सत्तेचे सूर जुळले तरी युतीच्या संसारातील कुरबुर काही संपण्याचे नाव नाही़ त्यामुळे उभय पक्षांमध्ये श्रेय लाटण्यासाठी चढाओढ सुरू आहे़ यापैकीच एक सुधारित मालमत्ता कराच्या सूत्रात कार्पेट क्षेत्रफळाला रेडिरेकनरनुसार १़२० भारांकाने गुणून मालमत्ता कर निश्चित करण्यात येणार होता़ ही वाढ भाजपाच्या मागणीनंतरच रद्द झाल्याचा दावा करीत भाजपा नेत्यांनी शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली होती़ मात्र सुधारित मालमत्ता करावर पालिका महासभेत शिक्कामोर्तब होत असताना शिवसेनेने डाव साधला़ च्२,७५,२४६ म्हणजेच ५०० चौ़ फुटांपेक्षा मोठ्या असलेल्या १९ टक्के मालमत्तांच्या करामध्ये वाढ होणार आहे़ च्सुधारित मालमत्ता करानुसार १४़५२ टक्के वाढ म्हणजे ५७८ कोटींचा बोजा मुंबईकरांवर पडणार आहे़ निवासी मालमत्तांसाठी हा कर ११़७४ टक्के असणार आहे़ ५०० चौ़ फुटांखालील मालमत्तेतून मिळणारे १४७ कोटींच्या करामध्ये ५५ टक्के वाढ अपेक्षित होती़ ती रद्द झाल्यामुळे ही रक्कम पालिकेला आता मिळणार नाही़च्बिल्टअप क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर वसूल केल्यास पालिकेला ५०७७़६२ कोटींचे उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा होणार होते़ मात्र नवीन सूत्रानुसार कार्पेट क्षेत्रफळाप्रमाणे मालमत्ता कर वसूल होणार असल्याने पालिकेला ४,५६३़३३ कोटी उत्पन्न मिळणार आहे़ दरवर्षी ६ हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे़