Join us

चिमुरड्याला केले रक्तबंबाळ! आरेत चार वर्षांच्या बालकावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 5:23 PM

Attacked by a leopard : लोकमतने देखिल गेले काही महिने बिबट्याच्या बातम्या सातत्याने दिल्या असून लोकप्रतिनधी व वनखात्याचे लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देवनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करून पिंजरे लावावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मुंबई - आरे आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत गेले अनेक महिने बिबट्या येत आहे. आता बिबट्याने आपला मोर्चा आरेत वळवला असून तो चक्क येथील नागरिकांवर हल्ला करू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करून पिंजरे लावावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. लोकमतने देखिल गेले काही महिने बिबट्याच्या बातम्या सातत्याने दिल्या असून लोकप्रतिनधी व वनखात्याचे लक्ष वेधले आहे. गोरेगाव (पूर्व ) आरे मध्ये युनिट नंबर ३ च्या सरकारी निवासस्थान येथे रहात असलेल्या कुमार आयुष यादव या ४ वर्ष वयाच्या बालकावर बिबट्याने काल रात्री साडेआठ वाजता डोक्यावर, पाठीवर जोरदार हल्ला  केला आणि त्याला रक्तबंबाळ केले. बिबट्या त्याला बाजूला असलेल्या जंगलात घेऊन जात असताना आयुषचे मामा विनोद कुमार यादव यांनी बघता क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्या च्या तोंडातून आपल्या भाचा आयुषला वाचवले.हि बाब स्थानिक शिवसेनिकांनी स्थानिक आमदार  रविंद्र वायकर  कळवताच संदीप गाढवे शाखाप्रमुख ५२ व स्थानिक शाखासमन्वयक अर्चना भुरटे, उपशाखाप्रमुख शेखर व युनिट ३ मधील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरे पोलीस ठाण्याचे तानाजी खाडे व त्यांचे सहकारी व स्थानिक नागरिकांनी आयुषला ट्रामा हॉस्पिटलला घेऊन गेले आणि येथील डॉक्टरांनी आयुष वर उपचार केले. या हल्यात त्याच्या डोक्याला ७ टाके पडले आहे. त्याला घरी घेऊन आले. वन विभागाचे अधिकारी व संदीप गाढवे यांनी त्यांचा पंचनामा करत असताना संदीप गाढवे यांना पुन्हा एक कॉल आला की, बाजूच्या एकता नगर मध्ये उपशाखाप्रमुख शेखर यांच्या घराच्या बाहेर बिबट्या आहे. हे कळताच वनविभागाला घेऊन ते त्या ठिकाणी पोहचले असता घराच्या बाजूला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले , तर त्याच वेळी तेथील नागरिकांनी बिबट्याला रस्ता क्रॉस करताना बघितले. 

टॅग्स :बिबट्यावनविभागमुंबई