Join us

'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 12:28 PM

Balasaheb Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

मुंबई - शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांना आज स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात येत आहे. शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर शिवसेना नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देत बाळासाहेबांना अभिवादन करत आहेत. दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. 'स्मारक की मातोश्री 3?' असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन होऊन आठ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र या काळात बाळासाहेबांचे स्मारक उबे राहू शकलेले नाही. मुंबईतील महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीकडे हस्तांतरित करण्याल आली होती. तसेच २०१९ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमीपूजनही झाले होते. मात्र त्यानंतर हे काम पुढे सरकू शकलेले नाही. 

त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसेनेवर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी महापौर बंगल्याचा एक फोटो शेअर करत स्मारक की मातोश्री-३ असा बोचरा प्रश्न विचारला आहे.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेसंदीप देशपांडेशिवसेनामनसे