Join us

स्मार्ट सिटी फसवी योजना - राज ठाकरे

By admin | Published: December 09, 2015 12:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले. स्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असून, महानगरपालिकेच्या कारभारात केंद्र सरकारचा हस्तक्षेप करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. 

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी आहे. महानगरपालिकेच्या कारभारात केंद्र सरकारचा हस्तक्षेप कशाला ? स्मार्ट सिटीसाठी वेगळी कंपनी कशाला हवी ? असे सवाल राज ठाकरे यांनी विचारले. स्मार्ट सिटीसाठी केंद्राकडून मिळणारा निधी अत्यंत अपुरा असून, नव्याने योजना आली तर, विचार करु असे राज म्हणाले. 
केंद्रातले मोदी सरकार फक्त एकापाठोपाठ एक योजना जाहीर करत आहे असे राज म्हणाले. स्मार्ट सिटीसाठी देशातून एकूण ९८ शहरांची निवड झाली आहे. पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला विरोध केला. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंचा बोलवता धनी कोण ? याचा तुम्ही शोध घ्या असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 
राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे 
स्मार्ट सिटी योजनेसाठी वेगळी कंपनी कशाला हवी ? - राज ठाकरे
स्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकारची राजकीय खेळी आहे. महानगरपालिकेच्या कारभारता हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप कशाला ? राज ठाकरेंचा सवाल.
स्मार्ट सिटी योजनेवर राज ठाकरेंची टीका, स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी आहे - राज ठाकरे