मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर
By admin | Published: December 15, 2015 05:14 PM2015-12-15T17:14:02+5:302015-12-15T17:28:03+5:30
मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर झाला आहे. आज शिवसेना आणि मनसेने एनवेळी उपसुचनासह पाठिंबा दर्शवल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - मुंबई महापालिकेत स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर झाला आहे. आज शिवसेना आणि मनसेने एनवेळी उपसुचनासह पाठिंबा दर्शवल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. महापालिकेच कामकाज सुरु झाल्यानंतर आज शिवसेना आणि मनसेने स्मार्ट सिटीला ग्रीन सिग्नंल दिला. पण काँग्रेस आणि सपाचा विरोध कायम राहीला आहे पण त्यांच्या विरोधानंतरही बहुमताच्या आधारावर महापालिकेत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी पार्टीने तटस्थ भुमिका घेतली.
आज महापालिकेच कामकाज सुरु झाल्यानंतर सभागृहात शिवसेना आणि मनसेने स्मार्ट सिटीसंदर्भातल्या उपसूचना मांडल्या. या उपसूचनांना मनसे आणि भाजपने पाठिंबा दिला, तर शिवसेनेच्या उपसूचना मान्य झाल्या तरच पाठिंबा दिला जाईल, अन्यथा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला होता. स्मार्ट सिटी हा मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद, संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही असा आरोप त्यांनी केला होता.
स्मार्ट सिटी प्रस्तावावर शिवसेनेच्या उपसूचना -
स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांसाठी विभाग निवडण्याचा अधिकार महापालिकेला असावा
स्मार्ट सिटी अंतर्गत ६० लाख रोजगार उपलब्ध होतील त्यांपैकी ८० टक्के रोजगार स्थानिक भूमीपुत्रांना
दिला जावा, खाजगी संघटना, उद्योजक या योजनेत सहभागी केले जाऊ नयेत.