३४१ वीज ग्राहकांसाठी बसविण्यात आले स्मार्ट मीटर, सर्वेक्षण झाले पूर्ण 

By सचिन लुंगसे | Published: May 31, 2024 06:52 PM2024-05-31T18:52:22+5:302024-05-31T18:52:57+5:30

वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे.

Smart meters installed for 341 electricity consumers, survey completed  | ३४१ वीज ग्राहकांसाठी बसविण्यात आले स्मार्ट मीटर, सर्वेक्षण झाले पूर्ण 

३४१ वीज ग्राहकांसाठी बसविण्यात आले स्मार्ट मीटर, सर्वेक्षण झाले पूर्ण 

मुंबई : स्मार्ट मीटरचे तोटे सांगत राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्यास महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडून विरोध केला जात असतानाच दुसरीकडे महावितरणने स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून केली केली आहे. वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली आहे. महावितरणची १८ कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील ३२३ घरे अशा ३४१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत.

वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केली. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

कुठे किती स्मार्ट मीटर बसविले?
नागपूर शहर ६०
गोंदिया १४६
वर्धा ३०
भंडारा १०
चंद्रपूर ९५
एकूण ३४१

काय फायदा होणार?
- स्मार्ट मीटर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
- वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल.
- वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे वीजवापर समजेल.

काय समस्या येतात?
सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो.

अचूक बिलिंग
पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल.

Web Title: Smart meters installed for 341 electricity consumers, survey completed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज