सुज्ञ लोकं 'शिमग्यावर' प्रतिक्रिया देत नाहीत, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 11:50 AM2022-10-06T11:50:45+5:302022-10-06T12:03:03+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिमगा म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. 

Smart people don't react on 'Shimgya', Devendra Fadnavis scolds Uddhav Thackeray | सुज्ञ लोकं 'शिमग्यावर' प्रतिक्रिया देत नाहीत, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

सुज्ञ लोकं 'शिमग्यावर' प्रतिक्रिया देत नाहीत, फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

googlenewsNext

मुंबई - शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. आता, दोन्ही नेत्यांच्या भाषणावर इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसेकडून दोन्ही भाषणांवर टीका करण्यात आली आहे. भाजपनेही निशाणा साधला आहे. आता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला शिमगा म्हणत प्रतिक्रिया देणे टाळले. 

सुज्ञ माणसं शिमग्यावर प्रतिक्रिया देत नसतात, असे म्हणत दसरा मेळाव्याला शिमग्याची उपमा फडणवीस यांनी दिली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याचं कौतुकही केलं. 'मी दोन्ही भाषणं ऐकली नाहीत. कारण, मी धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर, दोन्ही भाषणाचा थोडा थोडा सारांश मी ऐकला. युट्यबूवर एकनाथ शिंदेंचं भाषण बघितलं. मी एवढंच सांगू शकेल, मी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. तर,  खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं. कारण, शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट कॅपेसिटीने गर्दी शिंदेंच्या मेळाव्याला होती, असेही फडणवीस यांनी सांगितलं. 

विधानसभेवर भगवा फडकणारच

मुंबईसह, उर्वरीत महाराष्ट्रातून कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला आले होते. त्यामुळे, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच हे कालच्या मेळाव्याने दाखवून दिले. त्यामुळे, मी मुख्यमंत्री शिंदेंचे अभिनंदन करतो, असेही फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंनी स्क्रीप्ट रायटर बदलला पाहिजे, दरवेळी तेच ते तेच ते.. एकतर स्क्रीप्ट रायटर बदला किंवा स्क्रीप्ट रायटरला क्रिएटीव्ह लिखान करायला लावा, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, विधानसभेवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणारच, असेही फडणवीस यांनी म्हटले.

मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून शिवसैनिकांना संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, अमित शाहांवर पुन्हा तोफ डागली. पाकिस्तानमधील माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.  

Web Title: Smart people don't react on 'Shimgya', Devendra Fadnavis scolds Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.