देशभरातील पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

By admin | Published: June 12, 2016 05:37 AM2016-06-12T05:37:05+5:302016-06-12T05:37:05+5:30

ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे.

'Smart' postmen across the country | देशभरातील पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

देशभरातील पोस्टमन झाले ‘स्मार्ट’

Next

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्राचा वाढता विस्तार पाहता टपाल विभागानेही कात टाकून ‘स्मार्ट’ मार्ग अवलंबिला आहे. टपाल विभागाने व्यवहार सुलभतेसाठी पोस्टमनच्या हाती अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप दिले आहे. जेणेकरून, स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्र, टपाल आदींच्या वितरणाची योग्य वेळेवर खातरजमा व्हावी यासाठी पोस्टमन्सना हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे.
टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए.के. दास यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडुप येथेही या मोबाइल अ‍ॅपचे आज उद्घाटन करण्यात आले. तसेच नुकतेच या अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते छिंदवाडा येथेही करण्यात आले आहे.
सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. भांडुप पूर्व येथील टपाल विभागात कार्यरत असणाऱ्या १८ पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पोस्टमन अ‍ॅपचा समावेश करण्यात आलेला आहे. टपाल वस्तू प्राप्त करणे, ई-हस्ताक्षर घेणे, त्याच ठिकाणी सेंट्रल सर्व्हरमध्ये संबंधित माहिती अपलोड करणे आदी या अ‍ॅप्लिकेशनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
मुंबईतील सर्व १७ व्यवसाय टपाल केंदे्र आणि ३५ विपणन कार्यकारी यांना उपमहाव्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत एकत्र आणून एक प्रभावी व्यवसाय विकास मंडळ सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
देशातील आर्थिक समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करायला मंत्रिमंडळाने १ जून २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी ‘माय गव्ह’ वेबसाइटवर लोगो डिझाइन आणि घोषवाक्य स्पर्धा सुरू करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्राची स्थापना
- ई-कॉमर्स ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता परळ येथे एक समर्पित यांत्रिक पार्सल प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे, असेही दास म्हणाले. १२ हजार चौरस फुटांवर विस्तारलेल्या या केंद्राची दररोज ३० हजार पार्सल इतकी क्षमता आहे.

महसुलात वाढ
व्यवसाय विकास, टपाल आणि बचत बँक या माध्यमातून सरकारला २०१५-१६ मध्ये एकूण १६७५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागाचा एकूण टपाल कार्यान्वयन महसूल ९५३ कोटी रुपये इतका आहे, असे दास यांनी या वेळी सांगितले.

- टपाल विभाग ऐरोलीत ४ हजार चौरस मीटर क्षेत्रावर ई-कॉमर्स पार्सल प्रक्रिया केंद्र विकसित करणार आहे. ई-कॉमर्स, स्पीड पोस्ट, लॉजिस्टिक पोस्ट, रिटेल पोस्ट, मीडिया पोस्ट, बिझनेस पोस्ट, बिल मेल सेवा, एक्स्प्रेस पार्सल पोस्ट, डायरेक्ट पोस्ट आदी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Smart' postmen across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.