Join us

शेतमाल, उत्पादनांना चांगला भाव मिळावा, यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:20 AM

(स्टेट आॅफ महाराष्ट्राज अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन) प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मुंबई : शेतमालाला चांगला भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांची उत्पादने थेट कॉपोर्रेट कंपन्यांना विकता यावीत, यासाठी राज्य सरकारने जागतिक बँकेच्या साहाय्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ (स्टेट आॅफ महाराष्ट्राज अ‍ॅग्रीबिझनेस अँड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन) प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्य सरकार, विविध कॉर्पोरेट कंपन्या, शेतकरी कंपन्या यांच्यात ४६ सामंजस्य करार करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात राज्यातील १० हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविला जाईल. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणे आणि या माध्यमातून कृषी, तसेच ग्रामविकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले. याप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख, मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव डी. के. जैन आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, प्रकल्पामुळे राज्यात दहा हजार गावांत कृषी व्यवसायाचा विकास होईल. जलयुक्त शिवारमुळे राज्यात पाण्याचे विकेंद्रित साठे तयार झाले. त्यामुळे कमी पाऊस होऊनही शेती उत्पादकता वाढली. शेतकºयांची साखळी तयार करुन विविध कार्यकारी संस्था, शेतकरी गट यांना सक्षम करायला हवे. त्यातून शेतीमालाला योग्य भाव मिळेल.>राज्य सरकारकडून ५६५ कोटींची निधीराज्यातील कृषी क्षेत्राशी निगडित विविध घटक, धोरणकर्ते आणि शेतकरी यात सहभागी झाले होते. या प्रकल्पात सुमारे २ हजार ११८ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यापैकी १ हजार ४८३ कोटींचा गुंतवणूक जागतिक बँक करणार आहे, तर राज्य सरकारकडून ५६५ कोटींची निधी दिला जाणार आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस