‘स्मार्ट सखी’साठी रंगणार चुरस!
By admin | Published: February 26, 2016 04:11 AM2016-02-26T04:11:22+5:302016-02-26T04:11:22+5:30
संसार नेटाने सांभाळणारी स्त्री प्रत्येक घराची ‘होम मिनिस्टर’ असते. पण आता तिला ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘शीतल अॅकॅडमी’ आयोजित ‘स्मार्ट सखी’ या अनोख्या स्पर्धेतून ‘स्मार्ट सखी
मुंबई : संसार नेटाने सांभाळणारी स्त्री प्रत्येक घराची ‘होम मिनिस्टर’ असते. पण आता तिला ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘शीतल अॅकॅडमी’ आयोजित ‘स्मार्ट सखी’ या अनोख्या स्पर्धेतून ‘स्मार्ट सखी’चा सन्मान मिळणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी चेंबूर येथे होणाऱ्या ‘स्मार्ट सखीं’च्या स्पर्धेत केवळ धम्माल मस्ती होणार नाही, तर सखींच्या ज्ञानाचीही कसोटी लागणार आहे. या कार्यक्रमात विजेत्या सखीला ‘स्मार्ट सखी २०१६’ने गौरविण्यात येणार आहे.
‘लोकमत’ सखी मंच आणि शीतल अॅकॅडमी यांच्यातर्फे ‘स्मार्ट सखी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या फेऱ्यांत सखींना आपले वेगळेपण सिद्ध करावे लागणार आहे. प्राथमिक फेरीसाठी फॅशन शो होणार आहे. यात १९९० ते २०१५ या कालावधीत पोशाखात झालेल्या बदलांवर आधारित वेषभूषा करून सखींनी रॅम्पवॉक करायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी दिलेल्या उत्पादनाची जाहिरात बनवून सखींना सादर करावी लागणार आहे. तिसऱ्या फेरीत सखींना कला सादर कराव्या लागणार आहेत. अंतिम फेरीत सखींना परीक्षकांना सामोरे जावे लागणार आहे. जी सखी नंबर वन ठरेल तिला ‘स्मार्ट सखी २०१६’ने गौरविण्यात येईल.
या स्पर्धेसाठी ‘शीतल अॅकॅडमी’ प्रायोजक आहे. चेंबूर येथील सर्वांत जुनी आणि १०० टक्के इंग्रजी भाषा येण्याची हमी देणारी अॅकॅडमी म्हणून या संस्थेची ओळख आहे. इंग्रजी शिकणे ही काळाची गरज झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सोप्या पद्धतीने सहज इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता यावे, यासाठी शीतल अॅकॅडमी ही सुवर्णसंधी घेऊन आली आहे. या अॅकॅडमीत कार्यक्रमाच्या दिवशी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना शुल्कात ५०% सूट मिळणार असून, मोफत सीडी आणि पुस्तकांचा संच दिला जाणार आहे. सखींसाठी हळदीकुंकवाचेही आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सखींना खळखळून हसवायला ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ आणि ‘जय मल्हार’फेम जयवंत भालेकर येणार आहेत. त्यांचा कॉमेडीचा जलवाही सखींना अनुभवता येणार आहे.
स्थळ : एल. यू. गडकरी सभागृह, एन. जी. आचार्य मार्ग, सुभाषनगर, चेंबूर (पू.) वेळ - दुपारी ३.३० वाजता.
स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, सखींनी ८६५२२००२२१ / ९१६७७९०४७६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.