- महेश चेमटेमुंबई : लोकलच्या ७६ लाख प्रवाशांना लवकरच क्रेडिट-डेबिट कार्डने उपनगरीय लोकलचे तिकीट खरेदी करता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपनगरीय तिकीट प्रक्रिया सुलभ होण्यासाठी याबाबत रेल्वे सूचना प्रणाली केंद्राने (क्रिस) नुकतीच यशस्वी चाचणी केली. लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुरू करण्यात येईल.सद्यस्थितीत लोकल तिकिटांसाठी तिकीट खिडकीसह एटीव्हीएम, स्मार्ट कार्ड, सीओटीव्हीएम (सुट्टे पैसे टाकून तिकीट घेणे), मोबाइल तिकीट, जनसाधारण तिकीट सेवा असे पर्याय आहेत.>प्राथमिक चाचणी यशस्वीस्मार्ट कार्ड स्वीकारणाऱ्या यंत्रणेत क्रेडिट-डेबिट कार्डने तिकीट उपलब्ध करण्याबाबतची प्राथमिक चाचणी ‘क्रिस’ अंतर्गत प्रयोगशाळेत यशस्वी झाली आहे. आणखी एक चाचणी केल्यानंतर, थेट के्रडिट-डेबिट कार्डने प्रवाशांना लोकल तिकीट काढता येणार आहे.यासाठी स्मार्ट कार्ड स्वीकारणाºया यंत्रणेत काही प्रमाणात बदल करण्यात येतील. नवीन यंत्रणेत के्रडिट-डेबिट कार्डसह स्मार्ट कार्डनेदेखील प्रवाशांना तिकीट घेता येईल, अशी माहिती क्रिसचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी दिली.प्रवाशांच्या प्रतिसादानंतर विस्तारसर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येईल. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता, या सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे, असे क्रिसच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
‘क्रेडिट-डेबिट’ कार्डद्वारे ‘स्मार्ट’ तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 6:07 AM