ट्रान्झिटमधील रहिवाशांना स्मार्ट कार्ड?

By admin | Published: July 17, 2014 01:10 AM2014-07-17T01:10:06+5:302014-07-17T01:10:06+5:30

मूळ लाभार्थी आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबतची इत्थंभूत माहिती संकलित केली जाणार आहे.

SmartCard residents in transit? | ट्रान्झिटमधील रहिवाशांना स्मार्ट कार्ड?

ट्रान्झिटमधील रहिवाशांना स्मार्ट कार्ड?

Next

मुंबई : म्हाडाच्या संक्रमण शिबिरात अनधिकृतपणे राहत असलेल्या साडेआठ हजारांवर घुसखोरांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव मंत्रालयात रखडला असताना आता संक्रमण शिबिरातील रहिवाशांना स्मार्ट कार्ड देण्याबाबत म्हाडाकडून विचारविनिमय सुरू आहे. मूळ लाभार्थी आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबतची इत्थंभूत माहिती संकलित केली जाणार
आहे. त्यानंतर रहिवाशाचे स्मार्ट कार्ड बनविण्याची कल्पना मांडली आहे.
पुनर्विकासामध्ये घर दिल्यानंतरही त्याबाबत भाडेकरूकडून म्हाडाची होणारी फसवणूक आणि घुसखोरी टाळण्यासाठी ही उपाययोजना राबविण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहर व उपनगरामध्ये म्हाडाची एकूण १३ हजार संक्रमण शिबिरे (ट्रॉन्झिट कॅम्प) आहेत. इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या वतीने गेल्या वर्षी त्याबाबत केलेल्या सर्व्हेमध्ये जवळपास साडेआठ हजारांवर कुटुंबे अनधिकृतपणे राहत असल्याचे उघडकीस आले. त्यामध्ये मूळ भाडेकरूकडून परस्पर खरेदी, कसल्याही व्यवहाराविना राहत असलेले आणि अतिक्रमण करून राहणाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. हे घुसखोर भाडेही देत नाहीत आणि त्यांना तेथून हटविणे शक्य होत नसल्याने म्हाडाने त्यांची वर्गवारी करून भाडे व अनामत रक्कम घेऊन नियमितीकरण करण्याचा प्रस्ताव जानेवारीमध्ये गृहनिर्माण विभागाला सादर केला आहे. मात्र त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही.
घुसखोराचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने भविष्यात त्यापासून सुटका व्हावी, यासाठी याबाबत सर्व माहिती संगणकावर संकलित केली जाणार आहे. प्रत्येक इमारत, त्या ठिकाणचे रहिवासी, छायाचित्र, त्यांच्याकडील आवश्यक पुरावे, पुनर्विकासानंतर त्यांना दिली जाणारी घरे, जागेचे क्षेत्रफळ, त्याच्या व्यवहाराच्या तपशिलाची नोंद असणार आहे. हा ‘डाटा’ कायमस्वरूपी संकलित करून ठेवला जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: SmartCard residents in transit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.