Join us

उद्रेकामागे संशयाचा धूर...

By admin | Published: January 03, 2015 2:01 AM

दिव्यात झालेल्या तोडफोडीतून संशयाचा धूर येत आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. संशयाचा धूर व्यक्त करण्यात आला आहे.

तब्बल १ कोटीचे नुकसान : १ लाख १७ हजारांची कॅश लुटलीमुंबई : दिव्यात झालेल्या तोडफोडीतून संशयाचा धूर येत आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. संशयाचा धूर व्यक्त करण्यात आला आहे. तांत्रिक बिघाड झाला, हे मान्य करतानास प्रवासी एवढी नासधूस करणार नाहीत, त्यामुळे यामागे विघातक वृत्तींचा हात असल्याची शंका मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांनी व्यक्त केली. तोडफोडीत रेल्वेचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुख्य म्हणजे दिव्यातील तिकिट काऊंटवरील एक लाख १७ हजार रुपयांची कॅश लुटल्याचे समोर आले आहे.ठाकुर्ली स्थानकाजवळ अप धीम्या बदलापूर लोकलचे तीन पेन्टोग्राफ सकाळी ६.५0 च्या सुमारास तुटले. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आणि रेल्वेकडून पेन्टोग्राफचे काम सुरु करण्यात आले. साधारपणे ७.२६ला काम पूर्ण झाले आणि लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र साडे आठच्या सुमारास दिवा स्थानकात प्रवाशांनी आंदोलन सुरू केले. एवढे मोठे आंदोलन कधीच झाले नव्हते, असा दावा सूद यांनी केला. एवढे मोठे आंदोलन का पेटले, याचा तपास शहर पोलिस करणार आहेत.दरम्यान, दिवा स्थानकात जाळपोळ, तोडफोडीची घटना घडत असतानाच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम हे बदलापूर लोकलने दिवा स्थानकात जाण्यासाठी निघाले. त्यांची लोकल पारसिक बोगद्याजवळ थांबलेली असतानाच तब्बल दहा ते बारा जणांचा जमाव त्यांच्या लोकलकडे येत होता. याची माहीती मिळताच निगम यांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे सूद यांनी सांगितले. या जमावाकडे लाठ्या, काठ्या, दगड, रॉड सारखे साहित्य होते. या लोकलजवळ पोहोचताच त्यांनी प्रवाशांना बाहेर काढून तोडफोड करण्यास सुरुवात केल्याचे सूद यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या घटनेत १३४ ट्रेन रद्द करण्यात आल्या. ७0 डाऊन, ५४ अप आणि ठाण्याच्या १० शटल ट्रेनचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई-हावडा व्हाया अलाहाबाद ट्रेनची वेळ बदलण्यात आली. या ट्रेन उशिराने धावत होत्या.अनेक जण जखमीघटनेत दोन मोटरमनव्यतिरिक्त आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) स्पेशल फोर्सचे चार जवान आणि एक सहायक सुरक्षा आयुक्त जखमी झाले. तसेच चार जीआरपीही जखमी (रेल्वे पोलीस) झाले. त्याचप्रमाणे एक पोलीस मोटार सायकल, चार पोलीस व्हॅन जाळण्यात आल्या. या प्रकरणी रेल्वेकडून गुन्हा दाखल झाला असून एकालाही अटक करण्यात आलेली नाही. दहा लोकलची कमतरता भासणार : दहा लोकलची तोडफोड करण्यात आल्याने दोन दिवस तरी या लोकल ताफ्यात येण्यास लागतील, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे साधारपणे ९० ते १०० फेऱ्या कमी होण्याची शक्यता आहे. या लोकल लवकरात लवकर ताफ्यात आणण्यासाठी रेल्वेकडून कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. देखभाल-दुरुस्तीत रेल्वे ‘नापास’गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेमार्गांवर सातत्याने बिघाड होत असून, देखभाल आणि दुरुस्तीत रेल्वे नापास ठरत असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब मध्य रेल्वेमार्गावर अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रीकल कामांसाठी वापरण्यात येणारे साहित्य चांगल्या दर्जाचे नसल्याचे खुद्द रेल्वे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी सांगितले. सध्या मध्य रेल्वेमार्गावर अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रीकल कामांसाठी ३०० कोटींपेक्षा जास्त निधीची गरज असून, यातील काही निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. ओव्हरहेड वायर तुटणे, पेन्टोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड, रूळ तुटणे या आणि अन्य घटनांमुळे मध्य रेल्वेचा सातत्याने बोजवारा उडत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण विभागात तर या घटनांनी कहरच केला आहे. याबाबत सूद म्हणाले, ठाणे ते कल्याण विभागात वाहनांसाठी ९ टक्केच चांगले रस्ते उपलब्ध असून, ७५ ते ८० टक्के रस्ते सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध हवेत. मात्र तसे नसल्याने या भागातील लोकांना लोकलवरच अवलंबून राहावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून सतत होणारे तांत्रिक बिघाड होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. यासाठी केल्या जाणाऱ्या कामांसाठी कोणत्याही प्रकारच्या साहित्याची कमतरता भासू नये म्हणून लांब पल्ल्याच्या मार्गावरील तसेच कोकण मार्गावरील साहित्याची मदत घेत आहोत. अज्ञातांविरोधात दंगल माजवण्याचे गुन्हेया उद्रेकाप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दंगल माजवणे, सरकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारणे, सरकारी कामात अडथळा यासह राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, असे गुन्हे दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जी. थोरात यांनी दिली. डोंबिवलीतील एटीव्हीएम नेमके कोणी तोडले, बुकिंग कार्यालयाचे कोणी नुकसान केले, याबाबतची सखोल चौकशी डोंबिवली जीआरपीही करीत असल्याची माहिती येथील लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी दिली. तसेच या प्रकरणासंदर्भात सीसीकॅमेऱ्यांचे फूटेज मागवण्यात आले असून संबंधितांवर निश्चित कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मोटरमनचा जीव वाचविण्यासाठी आटापिटाच्आंदोलन सुरू असतानाच तीन लोकल जागीच उभ्या होत्या. तर कल्याणच्या दिशेने जाणारी एक मेल गाडीही उभी होती. मात्र तीन लोकलचे मोटरमन आणि मेल गाडीचा लोको पायलटच त्यांच्या केबिनमध्ये उपस्थित नव्हते. जीव वाचविण्यासाठी या सर्वांनी आजूबाजूच्या इमारती आणि चाळींचा आसरा घेतला होता. ‘गाड्या सोडण्यासाठी आम्ही मोटरमनना शोधले. सर्व मोटरमन आणि लोको पायलट यांना गाड्या जागेवरून हलविण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना सुरक्षाही पुरविण्यात आली. मात्र ते प्रचंड घाबरले होते,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.च्मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवर असलेला जमाव, होणारी दगडफेक यातून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. त्यातच चार आरपीएफच्या जवानांनाही जमावाकडून मारहाण केली जात होती. त्यांनाही जमावातून सोडविण्याचे आदेश आम्हाला मिळाले आणि आम्ही त्यांचीही यातून सुटका केली. मुळात या आंदोलनात प्रवासी तर होतेच; पण त्याशिवाय अन्य वेगळ्या गटाचा जमावही यात दिसून आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.डिसेंबर महिन्यातच केली होती पाहणीठाकुर्लीजवळ पेन्टोग्राफची तांत्रिक समस्या उद्भवल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. मात्र डिसेंबर महिन्यातच या भागाची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती; आणि त्यानंतरही पुन्हा तोच प्रकार घडला.२४0 डब्यांचे वयोमान संपलेलोकलच्या २४0 डब्यांचे वयोमान संपलेले आहे. २५ वर्षापेक्षा अधिक हे डबे वापरण्यात आले असून, त्यांना आतापर्यंत ३२ वर्षे झाली आहेत. यातील १00 डबे लवकरच काढून टाकण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत परावर्तनाची प्रक्रिया पूर्ण३१ जानेवारीपर्यंत डीसी ते एसी परावर्तनाची सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे सूद यांनी सांगितले. या परावर्तनाची चाचणी यशस्वी झाली असली तरी अन्य प्रक्रिया बाकी आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर बम्बार्डियर लोकलही आमच्या ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती सूद यांनी दिली.