मुंबई : बेस्ट उपक्रमातर्फे यापुढे एसएमएस किंवा ई-मेलद्वारे शहर विभागातील ग्राहकांना विजेचे बिल पाठविण्यात येणार आहे़ अर्थात, छापील बिलाऐवजी ई-मेल किंवा एसएमएसद्वारे बिल स्वीकारण्याचा पर्याय ग्राहकांचा असणार आहे.कुलाबा ते माहिम, सायन अशा शहर भागात दहा लाख ग्राहकांना बेस्टमार्फत वीजपुरवठा केला जातो़ दर महिन्याचे बिल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बेस्टला प्रती बिल १२ ते १५ रुपये खर्च करावे लागत आहेत़ तसेच बिलची छपाई असे मिळून १३ ते १६ रुपये बेस्टला प्रत्येक बिलापोटी खर्च येत असतो़ असे एकूण दीड कोटी रुपये दर महा केवळ वीज बिलांच्या वितरणासाठी खर्च होत आहे़ पालिकेकडून मिळणारे अनुदान, कर्ज, भाडेवाढ या मार्गाने तूट भरुन काढण्याचे प्रयत्न बेस्टचे सुरु आहेत़ त्याचबरोबर अनावश्यक खर्चातही आता कपात करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
वीज ग्राहकांसाठी एसएमएस, ई-बिल
By admin | Published: June 11, 2015 5:55 AM