मुंबई : शिवडी डॉक येथील कंटेनरमधील चपलांतून कस्टम विभागाने ११ कोटी ४० लाख किमतीचे ३८ किलो सोने जप्त केले आहे. कस्टम विभागाने केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. डोंगरीतील अल रेहम इम्पेक्स या एंटरप्रायझेसने थायलंडमधून या सोन्याची तस्करी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.कस्टम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी चपलांनी भरलेला कंटेनर इंदिरा डॉकमध्ये उतरविण्यात आला. तेथून पुढे तो शिवडी डॉक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासादरम्यान कंटेनरमध्ये काही संशयास्पद असल्याचे कस्टम अधिकाºयांच्या लक्षात आले. तपासात चपलांच्या सोलमधून सोन्याची तस्करी केल्याचे समोर आले. चपलांच्या सोलमधून तब्बल ३८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने कस्टम अधिकारीसुद्धा चक्रावून गेले आहेत. या सोन्यावर थायलंडचा मार्क आहे. हे सोने दुर्मीळ असते. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटापूर्वी अशा प्रकारे सोन्याची तस्करी करण्यात आली होती.यापूर्वीही अटक ?संबंधित क्लीअरिंग एजंट कस्टमच्या काही विशेष अधिकाºयांमार्फत ३० ते ४० कंटेनरमधून माल मागवतो. एजंटला यापूर्वीही तलवार आणि सिगारेटच्या तस्करीप्रकरणी अटक झाली होती, असे कळते. यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने मे महिन्यात १५ कोटी किमतीचे ५२ किलो सोने जप्त केले होते. दिल्लीतील व्यापाºयाकडून या सोन्याची तस्करी दुबईतून करण्यातआली होती.
चपलांतून ११ कोटींच्या सोन्याची तस्करी, कस्टम विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 2:04 AM