पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक
By मनोज गडनीस | Updated: March 6, 2024 16:40 IST2024-03-06T16:38:15+5:302024-03-06T16:40:24+5:30
पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

पाण्याच्या पंपातून गांजाची तस्करी, विमानतळावर एकाला अटक
मनोज गडनीस, मुंबई : पाण्याच्या पंपाद्वारे गाजांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईविमानतळावरी कार्गो विभागात कार्यरत असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. परदेशातून मालवाहतुकीच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी काही संशयास्पद मालाची तपासणी केली असता पाण्याच्या पंपामध्ये गांजा लपविल्याचे आढळून आले.
प्राप्त माहितीनुसार, थायलंड येथून विमानाद्वारे होणाऱ्या माल वाहतुकीद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर थायलंड येथून मुंबईत आलेल्या काही सामानाची तपासणी अधिकाऱ्यांनी केली. थायलंड येथून भारतामध्ये पाण्याचे पंप (हातपंप) भारतात आले होते. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही संशयास्पद सामान असल्याचे जाणवल्यावर अधिकाऱ्यांनी हे हातपंप फोडले तेव्हा त्यात४४७ ग्रॅम गांजा आढळून आला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच, हे सामान कुणी मागवले होते व ते कुणी कुठून कसे पाठवले, याचा अधिक तपास आता अधिकारी करत आहेत.