कुरिअरमधून सोन्याची तस्करी, ३३ कोटींचे ६५ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 09:38 AM2022-09-22T09:38:22+5:302022-09-22T09:39:04+5:30

केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रथमच कुरिअर कंपनीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

Smuggling of gold through courier, 65 kg gold worth 33 crore seized | कुरिअरमधून सोन्याची तस्करी, ३३ कोटींचे ६५ किलो सोने जप्त

कुरिअरमधून सोन्याची तस्करी, ३३ कोटींचे ६५ किलो सोने जप्त

Next

लोकमूत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिझोराम येथून कुरिअरच्या माध्यमातून झालेल्या सोन्याच्या तस्करीचा छडा लावण्यात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेला (डीआरआय) यश आले असून, एकूण ६५ किलो सोन्याचे ३९४ बार सोने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. भिवंडी, दिल्ली आणि बिहारमध्ये हे सोने कुरिअरच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. या सोन्याची किंमत ३३ कोटी ४० लाख रुपये एवढी आहे. 

केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रथमच कुरिअर कंपनीच्या माध्यमातून सोन्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  मिझोराम येथून सोन्याचे बार भारतातील काही राज्यांत वितरित होत असल्याची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली होती. याचा पाठपुरावा करताना या तस्करीमध्ये लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणारी एक कंपनी सहभागी असल्याची पक्की खबर अधिकाऱ्यांना मिळाली. या कंपनीच्या विविध मालांच्या आवक-जावकीवर अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. 
याच कंपनीच्या कुरिअर सेवेतर्फे मिझोराम येथून एक पार्सल भिवंडी येथे १९ सप्टेंबर रोजी आल्याचे अधिकाऱ्यांना समजले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भिवंडी येथे जात पार्सलची तपासणी केली असता, त्यात १९ किलो वजनाचे सोन्याचे १२० बार आढळून आले. याची किंमत १० कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. 

 मुद्दाम केली मिझोरामची निवड 
n अशीच आणखी दोन पार्सल याच कुरिअर कंपनीच्या माध्यमातून दिल्ली आणि बिहारमध्ये गेल्याचीही माहिती अधिकाऱ्यांना मिळाली.  अधिकाऱ्यांनी दिल्ली आणि बिहारमध्येही छापेमारी केली. 
n बिहारमधील छाप्यात २८ किलो वजनाचे सोन्याचे १७२ बार आढळून आले. याची किंमत १४ कोटी ५० लाख रुपये आहे. 
n दिल्लीमध्ये टाकलेल्या छाप्यात १६ किलो वजनाचे १०२ सोन्याचे बार आढळून आले. याची किंमत ८ कोटी ६९ लाख रुपये इतकी आहे. 
n जप्त झालेले सोने हे परदेशातून भारतात आल्याचा 
अधिकाऱ्यांना संशय आहे. 
n तपास यंत्रणांचे फारसे लक्ष जाऊ नये यासाठी तस्करी करण्यासाठी मिझोरामची मुद्दाम निवड केल्याचाही अधिकाऱ्यांना संशय आहे.

Web Title: Smuggling of gold through courier, 65 kg gold worth 33 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.