मुंबई विमानतळावर पकडली सात पक्ष्यांची तस्करी, एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

By मनोज गडनीस | Published: July 3, 2024 07:32 PM2024-07-03T19:32:13+5:302024-07-03T19:33:29+5:30

Mumbai Airport News: मुंबई विमानतळावरून जकार्ता येथे जाणाऱ्या एका प्रवाशाला दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या बॅगेत एका बॉक्समध्ये त्याने हे पक्षी लपवले होते. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. 

Smuggling of seven birds caught at Mumbai airport, operation of Air Intelligence Unit | मुंबई विमानतळावर पकडली सात पक्ष्यांची तस्करी, एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

मुंबई विमानतळावर पकडली सात पक्ष्यांची तस्करी, एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई

- मनोज गडनीस
मुंबई - मुंबई विमानतळावरून जकार्ता येथे जाणाऱ्या एका प्रवाशाला दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या बॅगेत एका बॉक्समध्ये त्याने हे पक्षी लपवले होते. सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. 

मुंबईतून अंमली पदार्थ किंवा काही विशिष्ट गोष्टींची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी विमानतळावर पाहणी सुरू केली. या दरम्यान नयन बारिया (२३) या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्या दरम्यान त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये एका मोठा बॉक्समध्ये त्याने एकूण ७ पक्षी लपवल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले.

Web Title: Smuggling of seven birds caught at Mumbai airport, operation of Air Intelligence Unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई