Join us

‘प्रायव्हेट पार्ट’मधून एक किलो सोन्याची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशातून विविध मालाची तस्करी करण्यासाठी कोण कोणत्या क्लृप्त्या लढवील, हे सांगता शकत नाही. शुल्क ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : परदेशातून विविध मालाची तस्करी करण्यासाठी कोण कोणत्या क्लृप्त्या लढवील, हे सांगता शकत नाही. शुल्क चुकविण्यासाठी तीन केनियन महिलांनी आपल्या ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये तब्बल ९३७.७८ ग्रॅम सोने लपवून आणल्याची बाब तपास यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. दोहाहून मुंबई आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर आल्या असताना त्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली.

खुरेशा अली (वय ६१), अब्दुल्लाही अब्दिया अदान (४३) व अली सादिया अल्लो (४५) यांनी ‘प्रायव्हेट पार्ट’मध्ये लपवलेल्या सोन्याच्या बिस्किटांचे तुकडे वैद्यकीय तपासणी करून काढण्यात आले. अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) ही कारवाई करून त्यांना केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात दिले आहे.

तीन केनियन महिला या अमली पदार्थ घेऊन मुंबई विमानतळावर मंगळवारी येणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबईच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. मात्र, झडती घेतली असता त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. तपासणीवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केली असता लघवीच्या जागी व पार्श्वभागात पाकिटे लपवले असल्याचे आढळून आले. उपचार करून एकूण १३ पाकिटे काढण्यात आली. त्यात एकूण १७ तोळे सोन्याचे तुकडे होते. ती जप्त करून पुढील कारवाईसाठी कस्टम विभागाकडे सुपुर्द करण्यात आले.

एनसीबीची अशा प्रकारची दुसरी कारवाई आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी एका परदेशी नागरिकाला पकडून त्याच्या पोटात लपवलेले १० कोटींचे कोकेन जप्त केले होते.

तिन्ही महिलांकडून एकूण ९३७.७८ ग्रॅम सोने मिळाले आहे. एकूण १३ पाकिटांमध्ये १७ तोळे सोन्याचे तुकडे होते. प्रत्येक पाकिटात जवळपास २० ते १०० ग्रॅम सोने होते.