Join us

पालिकेच्या शाळेत आढळला साप, कोविडमुळे बंद शाळांत होतोय वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 1:05 PM

सध्या कोविड-१९ मध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांची वर्दळ नसल्याने सर्प शाळेतील आवारात फिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे साप कधीकधी शाळेतील वर्गातही येतात.

ठळक मुद्देसध्या कोविड-१९ मध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांची वर्दळ नसल्याने सर्प शाळेतील आवारात फिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे साप कधीकधी शाळेतील वर्गातही येतात.

मुंबई :  गोरेगाव (पूर्व ) येथील आरे कॉलनी शाळेच्या आवारातील वडाच्या चौथऱ्याच्या बाजूला आज मोठा साप होता. सदर साप पकडण्यासाठी सर्प मित्रास बोलाविण्यात आले. पुन्हा त्याला जंगलात सोडण्यात आले.लॉकडाऊन नंतरच्या निरव शांततेमुळे बरेच सर्प शाळेच्या आवारात दिवसाही दिसत आहेत. सदर साप सकाळी दहा वाजता दृष्टीस पडला.

सध्या कोविड-१९ मध्ये शाळा बंद असल्याने व विद्यार्थ्यांची वर्दळ नसल्याने सर्प शाळेतील आवारात फिरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. हे साप कधीकधी शाळेतील वर्गातही येतात. सदर शाळा आरे कॉलनीमध्ये युनिट क्रमांक १६ येथील वस्तूपासून दूर टेकडीवर असल्याने येथे बिबट्याचाही वावर असतो. तसेच याठिकाणी या दिवसात मोरही नजरेस पडत आहे. बऱ्याचदा येथील सफाई कामगारांना सकाळी वर्गाची सफाई करताना वर्गात व शाळेत सर्प दिसला आहे. त्यामुळे सदर  शाळांची साफसफाई करताना  कर्मचाऱ्यांच्या मनात एक  प्रकारची भिती असते. या शाळेत ज्यावेळी साप दिसतो त्यावेळी सर्पमित्राला बोलावून त्याला पुन्हा सुरक्षितपणे जंगलात सोडले जाते .

टॅग्स :शाळामुंबईसाप