नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेदरम्यान वाडय़ात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पनवेलमध्ये याच मोहिमेदरम्यान एका विद्याथ्र्याला सर्पदंश झाला. विहिघर हायस्कूलच्या परिसरात ही घटना घडली. संगम गणोश फडके (15) असे या विद्याथ्र्याचे नाव असून, तो नववीत शिकतो.
शनिवारी सकाळी शाळेच्या वेळेत विद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्या वेळी संगमला सर्पदंश झाला. त्वरित उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला. विद्यालयाच्याच्या मैदानातच सफाई करताना झुडपात असलेला घोणस जातीचा साप संगमच्या पायाला चावला. हा प्रकार समजताच मुख्याध्यापक आर.एम. सकंद यांनी संगमला पनवेल ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले.
विशेष म्हणजे विहिघर येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नेरे येथील ग्रामीण रु ग्णालयात प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कोणतेही प्राथमिक उपचार न करता त्याला पनवेलला न्यावे लागले.
दंश केलेला साप अत्यंत विषारी असून, आम्ही संबंधितावर उपचार सुरू केले आहेत. शरीरातून विष पूर्णपणो उतरले नसल्याने दोन दिवस त्याला आमच्या देखरेखीत ठेवावे लागेल, अशी माहिती पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बी. लोहारे यांनी दिली. (प्रतिनिधी)