...म्हणून सासूने घेतला जावयाचा चावा, कामावरून घरीयेण्यास उशीर झाल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:40 AM2018-04-15T05:40:59+5:302018-04-15T05:40:59+5:30

... so the bite to be taken to the mother-in-law, the delayed work at home | ...म्हणून सासूने घेतला जावयाचा चावा, कामावरून घरीयेण्यास उशीर झाल्याचा राग

...म्हणून सासूने घेतला जावयाचा चावा, कामावरून घरीयेण्यास उशीर झाल्याचा राग

Next

मुंबई : कामावरून घरी यायला उशीर झाला म्हणून पत्नीने रागाने माहेर गाठले. तिला परत आणण्यासाठी माहेरी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी रॉडने मारहाण केली. तर सासू आणि मेव्हणीने त्याच्या हाताचा कडकडून चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी त्याने आर.सी.एफ. पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सासूसह अन्य मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेंबूरच्या नागाबाबा नगर परिसरात २८ वर्षीय हरीश (नावात बदल) हा पत्नी आणि ५५ वर्षांच्या आईसोबत राहतो. वर्षभरापूर्वीच त्याचा ओळखीतील नेहा (नावात बदल) सोबत विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर नेहाने सासूसोबत भांडण सुरू केले. नेहाच्या भांडखोर स्वभावामुळे हरीश नेहासह विजयनगर परिसरात राहण्यास आला. तो एका बांधकाम साइटवर सुपरवायझर आहे. स्वतंत्र राहत असतानाही नेहाच्या भांडखोर स्वभावात फरक पडत नव्हता. कामावरून घरी आल्यानंतर ती वाद घालत असे.
९ एप्रिल रोजी काम जास्त असल्याने रात्री ९ वाजेपर्यंत हरीश कामावरच होता. घरी लवकर येणार असल्याचे सांगूनदेखील तो न आल्याने नेहाचा पारा चढला. तिने त्याला फोन करून जाब विचारला. थोड्याच वेळात घरी येतो, असे सांगूनही नेहा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. उलट मी मम्मीच्या घरी जाते, असे सांगून तिने फोन ठेवला. पत्नी माहेरी जाऊ नये म्हणून हरीशने काम सोडून घर गाठले. मात्र तोपर्यंत नेहा निघून गेली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने तिच्या माहेरी धाव घेतली. त्याने पत्नीची माफी मागत तिला घरी येण्यास सांगितले. मात्र तिने त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तर सासू आणि मेहुणीने त्याला मारहाण सुरू केली. रागाच्या भरात दोघींनीही त्याच्या हातावर कडकडून चावा घेतला.
त्यानंतर मेहुण्यानेही लोखंडी रॉडने त्याला मारहाण सुरू केली. सासरचे ते रौद्ररूप पाहून हरीशने कसाबसा तेथून पळ काढत शताब्दी रुग्णालय गाठले. तेथे उपचार घेतल्यानंतर शनिवारी त्याने आर.सी.एफ. पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीसह सासरच्या मंडळीविरुद्ध मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: ... so the bite to be taken to the mother-in-law, the delayed work at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.