...म्हणून डबेवाल्यांनी वाटले लाडू!

By admin | Published: May 12, 2017 02:07 AM2017-05-12T02:07:37+5:302017-05-12T02:07:37+5:30

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. या फाशीच्या शिक्षेला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

... so dabbawalas felt Laddo! | ...म्हणून डबेवाल्यांनी वाटले लाडू!

...म्हणून डबेवाल्यांनी वाटले लाडू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. या फाशीच्या शिक्षेला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी बुधवारी सकाळी लोअर परळ रेल्वे स्थानक पुलाजवळील डबेवाल्यांच्या जागेवर लाडू वाटलेत.
जाधव यांची फाशी रद्द झाल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाला आहे. तसा मुंबईच्या डबेवाल्यांनाही आहे. जाधव भारतीय तर आहेतच, त्यातही ते मराठी आहेत. त्यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, तेव्हा मुंबईच्या डबेवाल्यांनी पाकिस्तानचा जाहीर निषेध केला होता. आता त्यांच्या फाशीला स्थगिती
मिळाली आहे. प्रत्येक भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र, मराठी माणसांसाठी तर ही अत्यानंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.
‘सेव्ह-आरे’ या चळवळीत आता मुंबईच्या डबेवाल्यांनीही उडी घेतली आहे.
या चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी मुंबईच्या डबेवाल्यांची ग्रँटरोड येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली.
‘मुंबई मेट्रो ३’ प्रकल्प राबवताना ५ हजार वृक्षांची तोड केली जाणार असल्याची माहिती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी दिली.
झाडांची तोड न करता मुंबईचा विकास झाला पाहिजे, अशी डबेवाल्यांची भूमिका आहे.
त्यामुळे या चळवळीला पाठिंबा घोषित करताना वेळ पडली तर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू व वृक्ष वाचवू, असे डबेवाल्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: ... so dabbawalas felt Laddo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.