लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ५६ हजार ६६८ जणांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी १८ लाख ९५ हजार ३५० जणांना कोविड लस दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत १९ लाख २८ हजार २८७, पुण्यात १६ लाख ९० हजार ८७, ठाण्यात ८ लाख ७८ हजार ९४६, नागपूरमध्ये ७ लाख ८२ हजार ८८०, नाशिकमध्ये ५ लाख २४ हजार ५३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. पालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत २ लाख ६३ हजार ४३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, २ लाख ९१ हजार ८९४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, ६० हून अधिक वय असणाऱ्या ७ लाख ३१ हजार ६९२ तर ४५ हून वय असणाऱ्या ६ लाख ४ हजार १३६ जणांना लस देण्यात आली.
...................