राज्यात आतापर्यंत १ कोटी ८८ लाख नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:06 AM2021-05-13T04:06:21+5:302021-05-13T04:06:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी ३ लाख ७९ हजार ९३३ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी ३ लाख ७९ हजार ९३३ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८८ लाख २१ हजार ४८५ लाभार्थींना लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ५ लाख ९६ हजार ९१ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात पहिला डोस घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या ११ लाख ३४ हजार १४२ आहे, तर दुसरा डोस घेणारे ६ लाख ८० हजार ६८१ एवढे आराेग्य कर्मचारी आहेत. पहिला डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या १५ लाख ३५ हजार ४६७, तर आहे. दुसरा डोस घेतलेल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख ५६ हजार ७१० आहे. राज्यात सामान्य नागरिकांच्या लसीकरण प्रक्रियेला मागील काही दिवसांपासून वेग येत आहे. यात आतापर्यंत १ कोटी १९ लाख ९८७ सामान्य लाभार्थींनी पहिला डोस घेतला आहे, तर २३ लाख १७ हजार ४०७ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा लाभार्थी
मुंबई २८,१२,९६१
पुणे २५,०१,५९९
ठाणे १४,३५,८०७
नागपूर ११,२८,०४३
नाशिक ८,५५,५३१
......................................