राज्यात आतापर्यंत १ कोटी ९९ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:05 AM2021-05-17T04:05:32+5:302021-05-17T04:05:32+5:30

मुंबई : राज्यात शनिवारी १ लाख ९२ हजार ७४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण १ कोटी ...

So far 1 crore 99 lakh beneficiaries have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत १ कोटी ९९ लाख लाभार्थ्यांना लस

राज्यात आतापर्यंत १ कोटी ९९ लाख लाभार्थ्यांना लस

Next

मुंबई : राज्यात शनिवारी १ लाख ९२ हजार ७४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण १ कोटी ९९ लाख १२ हजार ९२४ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात २३ लाख ८ हजार १४१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, १८ लाख ४७ हजार ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांना, १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ४८ हजार ६७४ लाभार्थ्यांना, तर ४५ वर्षांवरील १ कोटी ५१ लाख ९ हजार ३१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात मुंबईत २८ लाख ८६ हजार ५९९, पुणे २६ लाख १३ हजार ५६३, ठाणे १५ लाख २५ हजार ५११, नागपूर १२ लाख ४ हजार २९९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

Web Title: So far 1 crore 99 lakh beneficiaries have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.