मुंबई : राज्यात शनिवारी १ लाख ९२ हजार ७४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण १ कोटी ९९ लाख १२ हजार ९२४ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात २३ लाख ८ हजार १४१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, १८ लाख ४७ हजार ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांना, १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ४८ हजार ६७४ लाभार्थ्यांना, तर ४५ वर्षांवरील १ कोटी ५१ लाख ९ हजार ३१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. राज्यात मुंबईत २८ लाख ८६ हजार ५९९, पुणे २६ लाख १३ हजार ५६३, ठाणे १५ लाख २५ हजार ५११, नागपूर १२ लाख ४ हजार २९९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.