आतापर्यंत 20 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:20 AM2021-04-22T07:20:42+5:302021-04-22T07:20:59+5:30
१८ वर्षांपुढील ४० लाख लाभार्थ्यांना मिळणार लस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड १९ ला प्रतिबंध करणारी लस नागरिकांना देण्यास मुंबई महापालिकेने १६ जानेवारी २०२१ पासून सुरुवात केली. कोरोना काळात रुग्ण सेवेसाठी पुढे असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यास सुरुवात झाली. मात्र कोविन ॲपमध्ये तांत्रिक घोळ, वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून अनेच्छा यामुळे या मोहिमेला प्रतिसाद मिळत नव्हता. दुसऱ्या टप्प्यात फ्रन्टलाइन वर्कर्स म्हणजेच पालिका, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. तर तिसऱ्या टप्प्यात नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले, ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. या मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत २० लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १६ लाख ६३ हजार ५५२ लोकांना पहिला डोस तर दोन लाख ६० हजार २८७ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. परंतु, लस वेळेत उपलब्ध होत नसल्याचा फटका वेळोवेळी या मोहिमेला बसत आहे.
लसीकरण केंद्रही वाढवावी लागणार
मुंबईत सध्या ४९ सरकारी व
पालिका लसीकरण केंद्रे तर
७२ खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. मात्र प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे ५०० लसीकरण केंद्र येत्या काही दिवसांमध्ये सुरू करण्याचा
पालिकेचा मानस आहे.
लोकसंख्या - दीड कोटी
१८ ते ४५ वयोगटातील लोकसंख्या
४०,०००००
साठा मर्यादित, माेहीम अडचणीत
nमुंबईत दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. यासाठी दर आठवड्याला किमान दहा लाख लसी मिळाव्या, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे.
nदोन दिवसांआड एक ते दीड लाख लसींचा साठा मुंबईला उपलब्ध होत आहे. तर दररोज ४० ते ४५ हजार लोकांचे लसीकरण होते. मात्र लसींचा साठा मर्यादित असल्याने ही मोहीम अडचणीत आली आहे.
लसीच्या दुसऱ्या डोसचे काय?
सुरुवातीला पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८
दिवसांनंतर देण्यात येत होता. मात्र नवीन नियमानुसार दोन डोसांमध्ये ४५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे.
आतापर्यंत १६ लाख ६३ हजार ५५५ लोकांना पहिला डोस, तर दोन लाख ६०,२८७ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
लसींचा साठा संपत आल्याने ९ एप्रिल रोजी लसीकरण
मोहीम थंडावली होती. अद्यापही मुंबईला लसींचा मर्यादित
साठा मिळत आहे.
त्यामुळे उपलब्ध लसींमध्ये दुसरा डोस देण्याचा कालावधी असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस ८ देण्यात येत आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे
४० टक्केच लसीकरण
४५ वर्षांवरील सुमारे ४० लाख मुंबईकरांचे लसीकरण सुरू आहे. १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे व ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या लोकांचे लसीकरण सुरू आहे. यापैकी १४ लाख ७३ हजार ३५० लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये सात लाख ८५ हजार ७२४ ज्येष्ठ नागरिक आहेत.
ज्येष्ठ आघाडीवर
लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत सात लाख ८५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून लसीकरण केंद्रांबाहेर ज्येष्ठांची गर्दी दिसून येत आहे.
ज्येष्ठ आघाडीवर
लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत सात लाख ८५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून लसीकरण केंद्रांबाहेर ज्येष्ठांची गर्दी दिसून येत आहे.