आतापर्यंत दोनशे पालिका कर्मचारी - अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:55 AM2020-09-30T00:55:45+5:302020-09-30T00:56:06+5:30
मार्चपासून पालिकेच्या दोन हजार ६५८ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोन हजार २१२ कर्मचाºयांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ४२८ सफाई कामगार बाधित झाले आहेत.
मुंबई : पालिकेतील आतापर्यंत दोन हजार ६५८ कर्मचारी - अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोनशे कर्मचारी - अधिकाºयांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ११० चतुर्थ श्रेणी आणि सफाई कर्मचाºयांचा समावेश आहे.
मार्चपासून पालिकेच्या दोन हजार ६५८ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोन हजार २१२ कर्मचाºयांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ४२८ सफाई कामगार बाधित झाले आहेत. तर चतुर्थश्रेणी आणि सफाई विभागातील ११० कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोनशे मृत कर्माचात्यांपैकी फक्त ७ ते ८ कर्मचाºयांनाच ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर इतरांचे दावे केंद्राने फेटाळले आहेत, असा आरोप करीत पालिका प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन पालिकेतील कर्मचारी संघटना करीत आहेत.