राज्यात आतापर्यंत ४५ लाख जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:07 AM2021-03-24T04:07:19+5:302021-03-24T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात ५ हजार १२१व्या लसीकरण सत्रात सोमवारी २ लाख ७६ हजार ३५४ लाभार्थ्यांचे लसीकरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात ५ हजार १२१व्या लसीकरण सत्रात सोमवारी २ लाख ७६ हजार ३५४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यात १ लाख ९० हजार ४३१ जणांना कोविशिल्ड तर ८५ हजार ९२३ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ४५ लाख ९१ हजार ४०१ लाभार्थ्यांना कोरोना लस दिल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले असून लाभार्थ्यांची संख्या ९ लाख ३ हजार ५९८ आहे. त्याखालोखाल पुण्यात ५ लाख २६ हजार २०९, ठाण्यात ३ लाख ४२ हजार ६१३, नागपूरमध्ये २ लाख ८६ हजार ४१८ जणांना लस देण्यात आली. मुख्यतः राज्यात अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत लाभार्थ्यांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे.
.................