राज्यात आतापर्यंत ५ कोटी ३९ लाख जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:07 AM2021-08-25T04:07:03+5:302021-08-25T04:07:03+5:30
मुंबई : राज्यात आतापर्यंत एकूण ५ कोटी ३९ लाख ६ हजार ३५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर ...
मुंबई : राज्यात आतापर्यंत एकूण ५ कोटी ३९ लाख ६ हजार ३५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर सोमवारी ७ लाख ९४ हजार २७ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात १२ लाख ९२ हजार १०७ आऱोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ७२ हजार ७०४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ३६ हजार ९०२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून १३ लाख ७५ हजार ६१७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ५६ लाख ८ हजार ४८९ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर १५ लाख १० हजार ८५० लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ९६ लाख ३८ हजार ७५२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ४१ लाख ९३८ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.