राज्यात आतापर्यंत ५० लाख रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:36+5:302021-05-21T04:06:36+5:30

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सामान्यांसह यंत्रणासाठी दिलासा देणारी बाब आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाला हरविलेल्या रुग्णांची संख्या ५० ...

So far 5 million patients in the state have been corona free | राज्यात आतापर्यंत ५० लाख रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आतापर्यंत ५० लाख रुग्ण कोरोनामुक्त

Next

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सामान्यांसह यंत्रणासाठी दिलासा देणारी बाब आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाला हरविलेल्या रुग्णांची संख्या ५० लाखांच्या घरात पोहोचली आहे. राज्यात दिवसभरात ४७ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ५० लाख २६ हजार ३०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या ३ लाख ८३ हजार २५३ रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात गुरुवारी २९ हजार ९११ रुग्ण आणि ७३८ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८ झाली असून मृतांचा आकडा ८५ हजार ३५५ आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २१ लाख ५४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.०९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २९ लाख ३५ हजार ४०९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २१ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दिवसभरातील ७३८ मृत्यूंपैकी ४२९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ३०९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. या ७३८ मृत्यूंमध्ये मुंबई ५९, ठाणे ४, ठाणे मनपा ८, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा १०, पालघर २१, वसई-विरार मनपा १०, रायगड ४३, पनवेल मनपा ७, नाशिक १०, नाशिक मनपा १०, अहमदनगर १४, अहमदनगर मनपा २, जळगाव मनपा १४, पुणे ६६, पुणे मनपा २१, पिंपरी-चिंचवड मनपा ४, सोलापूर २४, सोलापूर मनपा ४, सातारा १५, कोल्हापूर ४३, कोल्हापूर मनपा ९, सांगली २८, सांगली मिरज कुपवाड मनपा ४, सिंधुदुर्ग ७, रत्नागिरी २९, औरंगाबाद ७, औरंगाबाद मनपा १२, जालना २, हिंगोली १, परभणी १२, परभणी मनपा ४, लातूर १३, लातूर मनपा ५, उस्मानाबाद २३, बीड ४७, नांदेड १ अकोला ८, अकोला मनपा ७, अमरावती १९, अमरावती मनपा ३, यवतमाळ ६, वाशिम ३, नागपूर १२, नागपूर मनपा २४, वर्धा १६, भंडारा ८, गोंदिया ७, चंद्रपूर ५, चंद्रपूर मनपा ५, गडचिरोली १६, इ. रुग्णांचा समावेश आहे.

राज्यातील तरुणांमधील मृत्यूंचे चिंताजनक

राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तरुण रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नव्या वर्षात जानेवारी ते मेदरम्यान ३० पेक्षा कमी वय असणाऱ्या ६५१ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. मागील वर्षांत मार्च ते डिसेंबर या कालावधीत हे प्रमाण १ हजार ११७ इतके होते. याखेरीज, २०२१ मध्ये २० ते ४० वयोगटातील १२.९ लाख व्यक्ती संसर्गबाधित झाल्या, तर २०२० साली हे प्रमाण ७.३ लाख होते.

Web Title: So far 5 million patients in the state have been corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.