राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:09 AM2021-02-18T04:09:57+5:302021-02-18T04:09:57+5:30

मुंबई : राज्यात पार पडलेल्या ८२८व्या लसीकरण सत्रात एकूण ३६ हजार १३६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २९ हजार ...

So far 7 lakh 77 thousand beneficiaries have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना लसीकरण

राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना लसीकरण

Next

मुंबई : राज्यात पार पडलेल्या ८२८व्या लसीकरण सत्रात एकूण ३६ हजार १३६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २९ हजार ७१ लाभार्थ्यांना पहिला डोस व ७ हजार ६५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. यात ७ हजार ९५९ आरोग्य कर्मचारी तर २१ हजार ११२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच, ७ हजार ६५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसऱा डोस देण्यात आला आहे.

३५ हजार ७४९ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीचा डोस देण्यात आला. त्यापैकी २८ हजार ७७८ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ६ हजार ९७१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ३७८ लाभार्थ्यांना कोवॅक्सिन या लसीचा डोस देण्यात आला. त्यापैकी २९३ लाभार्थ्यांना पहिला डोस व ९४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात आतापर्यंत ७ लाख ७७ हजार ५०६ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले असून, लाभार्थ्यांची एकूण संख्या २ लाख २० हजार ९६३ इतकी आहे. त्याखालोखाल पुण्यात १ लाख ३२ हजार ६०२, ठाण्यात १ लाख २७ हजार ९०७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर राज्यात आतापर्यंत दुसरा डोस १६ हजार १८१ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.

Web Title: So far 7 lakh 77 thousand beneficiaries have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.