राज्यात आतापर्यंत ८९ हजार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 06:09 PM2020-05-02T18:09:05+5:302020-05-02T18:09:26+5:30
लॉकडाऊनच्या काळात .२२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८९,३८३ गुन्हे दाखल झाले.
५१ हजार वाहने जप्त
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात .२२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८९,३८३ गुन्हे दाखल झाले असून १७,८१३ व्यक्तींना अटक करण्यात आली. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ८२,१२८ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६२८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५१,०१३ वाहने जप्त करण्यात आली.परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १७१ घटनांची नोंद झाली असून यात ६५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात 342 पोलिसांना कोरोनाची लागण पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ५१ पोलीस अधिकारी व २९१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २३ पोलीस अधिकारी व २६ कर्मचारी कोरोना मुक्त झाले असून उरलेल्या २८पोलीस अधिकारी व २६२ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने ३ पोलिसाचे निधन झाले आहे .