मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ५५ लाख ९४ हजार ६४० लाभार्थींचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ११ लाख २ हजार ३८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ६ लाख १६ हजार ७०३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस, १२ लाख ८८ हजार ३७४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ४ लाख ६९ हजार ६४४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८० लाख ८ हजार ४२६ लाभार्थींना लसीचा पहिला डोस तर १३ लाख ९ हजार १११ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत २४ लाख ४२ हजार १४१, पुण्यात २१ लाख ९७ हजार ८३६, ठाण्यात १२ लाख १९ हजार ७२०, नागपूरमध्ये ९ लाख ५१ हजार ८१६ आणि नाशिकमध्ये ७ लाख १७ हजार ९७९ लाभार्थींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.