राज्यात आतापर्यंत १ कोटी ७९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:36+5:302021-05-10T04:07:36+5:30
मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात २ लाख ३६ हजार ९६० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर १८ ते ४४ ...
मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात २ लाख ३६ हजार ९६० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील एकूण ३ लाख ८४ हजार ९९३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत ११ लाख २५ हजार ९६० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ६७ हजार ६३ आऱोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १५ लाख ५८५ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ६ लाख १५ हजार ९९१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांमध्ये आतापर्यंत १ कोटी २० लाख २२ हजार ३५० लाभार्थ्यांना पहिला डोस तर २० लाख ४० हजार ४४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई २७२६६३१
पुणे २४३६४२१
ठाणे १४०४८१६
नागपूर १०८८९३२
नाशिक ८२६७६८