Join us

राज्यात आतापर्यंत ४ कोटी १७ लाखांहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:05 AM

मुंबई : सुरुवातीच्या काळात दिवसाला केवळ १ लाखांच्या घरात असणारे राज्यातील लसीकरण आता दिवसाला ४ लाखांहून अधिक क्षमतेत पोहोचले ...

मुंबई : सुरुवातीच्या काळात दिवसाला केवळ १ लाखांच्या घरात असणारे राज्यातील लसीकरण आता दिवसाला ४ लाखांहून अधिक क्षमतेत पोहोचले आहे. राज्यात सोमवारी ४ लाख ४९ हजार ५६२ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत ४ कोटी १७ लाख ७० हजार २०२ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७५ लाख ६२ हजार ३०८ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७ लाख ५९ हजार ६०५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ६० लाख ६ हजार ७८१ जणांनी पहिला डोस, तर ४ लाख ८४ हजार ४९१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात २१ लाख १४ हजार ३५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ११ लाख २२ हजार ५८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १२ लाख ८५ हजार ७०३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ९ लाख ९०३ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.