Join us

राज्यात आतापर्यंत ७ लाख १३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:08 AM

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण प्रक्रियेचे ७६६ वे सत्र मंगळवारी पार पडले. दिवसभरात २९ हजार ८८४ ...

मुंबई : राज्यात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण प्रक्रियेचे ७६६ वे सत्र मंगळवारी पार पडले. दिवसभरात २९ हजार ८८४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, २५ हजार २०५ लाभार्थ्यांना पहिल्यांदा लसीचा डोस देण्यात आला, तर ४ हजार ६७९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ९ हजार ५५६ आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि १५ हजार ६४९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ४ हजार ६७९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात २९ हजार ३८३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २४ हजार ८७३ लाभार्थ्यांना पहिला डोस व ४ हजार ५१० लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ४३४ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीने लसीकरण करण्यात आले आहे, त्यापैकी २६५ लाभार्थ्यांना पहिला डोस व १६९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत १ लाख १४ हजार २८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मुंबई खालोखाल ठाण्यात ६८ हजार ७४५, पुण्यात ६६ हजार ५० आणि नाशिकमध्ये ३२ हजार ६० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंतचे सर्वांत कमी लसीकरण हिंगोलीमध्ये झाले असून लाभार्थ्यांची एकूण संख्या ५ हजार २१२ इतकी आहे. त्यानंतर वाशिममध्ये ५ हजार ६६१, परभणी ६ हजार २१७ लाभार्थ्यांनी लस घेतली.

..........................