राज्यात आतापर्यंत ८९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:42+5:302021-04-09T04:07:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी ४ लाख ३७ हजार ९८३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात ...

So far more than 89 lakh beneficiaries have been vaccinated in the state | राज्यात आतापर्यंत ८९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

राज्यात आतापर्यंत ८९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी ४ लाख ३७ हजार ९८३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात ८९ लाख ५५ हजार ९१८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात १० लाख ४० हजार २२२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, ४ लाख ९७ हजार १९४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ९ लाख २० हजार १५७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला, तर २ लाख ९२ हजार ६७८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६१ लाख २० हजार ९७९ नागरिकांनी पहिला डोस, तर ८४ हजार ६८८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.

मुंबईत आतापर्यंत १५ लाख २७ हजार ३३६, ठाण्यात ६ लाख ६४ हजार ३२१, पुण्यात १२ लाख २२ हजार ७५२, नागपूरमध्ये ६ लाख १२ हजार ९५५, नाशिकमध्ये ३ लाख ८३ हजार ५४२, कोल्हापूरमध्ये ५ लाख २० हजार १०२ इ. जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

Web Title: So far more than 89 lakh beneficiaries have been vaccinated in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.