लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी ४ लाख ३७ हजार ९८३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात ८९ लाख ५५ हजार ९१८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात १० लाख ४० हजार २२२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, ४ लाख ९७ हजार १९४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. ९ लाख २० हजार १५७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला, तर २ लाख ९२ हजार ६७८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६१ लाख २० हजार ९७९ नागरिकांनी पहिला डोस, तर ८४ हजार ६८८ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
मुंबईत आतापर्यंत १५ लाख २७ हजार ३३६, ठाण्यात ६ लाख ६४ हजार ३२१, पुण्यात १२ लाख २२ हजार ७५२, नागपूरमध्ये ६ लाख १२ हजार ९५५, नाशिकमध्ये ३ लाख ८३ हजार ५४२, कोल्हापूरमध्ये ५ लाख २० हजार १०२ इ. जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.