वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:09 AM2021-08-23T04:09:17+5:302021-08-23T04:09:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ...

So far under Vande Bharat Abhiyan | वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत

वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत आतापर्यंत ३१ हजार ५०२ विमानांनी उड्डाण केले. या विमानांद्वारे तब्बल ४० लाख १७ हजार ३२३ नागरिकांना मायदेशी आणण्यात आले.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर भारतासह सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर निर्बंध लागू केले. त्यामुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांचे हाल झाले. ही स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपल्या नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी वंदे भारत अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

या अभियानासाठी सर्वाधिक सेवा एअर इंडियाच्या विमानांनी दिली. त्यांनी आतापर्यंत १५ हजार ७५२ विमानांच्या मदतीने २३ लाख ७० हजार ४५० प्रवाशांना भारतात आणले. त्याचप्रमाणे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खासगी विमानांनी १६ लाख ४६ हजार ८७३ प्रवाशांना सेवा दिली. त्यासाठी १५ हजार ७५२ विमानांनी उड्डाण केले.

Web Title: So far under Vande Bharat Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.