...तर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:07 AM2021-09-24T04:07:14+5:302021-09-24T04:07:14+5:30

तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यास चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

... so the green light to start school after Diwali! | ...तर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील!

...तर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील!

Next

तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यास चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुढील १३ ते १४ दिवसांत कोरोना संसर्गाच्या रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेता येणार आहे. शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि रुग्णसंख्या विचारात घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मत चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी मांडले आहे. त्या- त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, शाळा सुरू करता येतील. मात्र, त्याआधी लसीकरण, शाळांची स्वच्छता, आवश्यक उपाययोजना यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार, असा प्रश्न अनेकांना पडला असून, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षकही शाळा सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून, कोरोना स्थिती नियंत्रणात राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. त्यामुळे ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत. त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याची प्रतिक्रिया पारेख यांनी दिली.

शाळा सुरू करण्याची तारीख निश्चित नसली तरी शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइझ करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे, अशी तयारी शिक्षण विभागाला यादरम्यान पूर्ण करायची आहे. स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून, शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू केली जात असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा आणि मुख्याध्यापक, शिक्षकही सकारात्मक असून, त्यादृष्टीने शिक्षण विभागाने सूचना दिल्यास तयारी करू, अशी प्रतिक्रिया ते देत आहेत.

Web Title: ... so the green light to start school after Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.