Join us

...म्हणून पतीने नाकारले पाच वर्ष शारीरिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 3:33 AM

प्रतिष्ठीत आणि उच्चशिक्षित कुटुंबातील एकुलती एक मुलगी. त्यात महिना ८० हजार पगार पाहून तिच्यासोबत विवाहगाठ बांधली.

- मनीषा म्हात्रे मुंबई : प्रतिष्ठीत आणि उच्चशिक्षित कुटुंबातील एकुलती एक मुलगी. त्यात महिना ८० हजार पगार पाहून तिच्यासोबत विवाहगाठ बांधली. हा डाव यशस्वी होताच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थेट घटस्फोटाची धमकी देत पतीने डेबीट कार्ड हिसकावले. नोकरी सोडून तिचा गलेगठ्ठ पगाराचे पैसे तो बेटींगवर उधळू लागला. अशा स्वरु असलेल्या ऐशोआरामाच्या जीवनाला ब्रेक लागू नये म्हणून पतीने ५ वर्षे शारिरीक संबंध नाकारले. मुल झाले तर ती नोकरी सोडून घरी बसेल म्हणून ही त्याची त्यामागची धारणा होती. अशा विचित्र प्रकारे सुरु असलेल्या कौटुंबिक छळाला वाचा फोडत तिने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिच्या तक्रारीवरुन बोरिवली पोलिसांनी पती अमीश शहासह त्याच्या आई वडील आणि बहिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बोरीवली परिसरात राहणारी रश्मी एका नामांकीत कंपनीत नोकरीला असून महिन्याला ८० हजार पगार घेते. २०१३ मध्ये अमीष शहाचे स्थळ आले. वडीलांनी सर्व लग्नाचा खर्च उचलत थाटामाटात तिचा विवाह केला. रश्मीने सुखी संसाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली असतानाच, लग्नाच्या दुसºया दिवशीच पतीने तिचे डेबीट कार्ड हिसकावले. याबाबत कुणाला सांगितल्यास घटस्फोटाची धमकी दिली. फक्त पगार बघून लग्न केल्याचे तिला समजले आणि तिच्या पायाखालची जमिनच सरकली. याप्रकारानंतर सासू- सासऱ्याकडून छळ सुरु झाला. समाजात आई वडीलांची असलेली प्रतिष्ठा आणि मधूमेहाच्या आजारामुळे हे त्यांना समजल्याने धक्का बसेन म्हणून ती शांत राहिली.कामावरुन घरी परतल्यानंतर घरातील काम उरकेपर्यंत १ वाजे. पुन्हा सकाळी ४ वाजल्यापासून दुसरा दिवस सुरु होत. या दिनक्रमामुळे ती आजारी पडली. पगार पती काढून घेत असल्यामुळे वडीलांनी तिचा उपचाराचा खर्च भागवला.रश्मीचा सर्व पैसा तो बेटींगवर उडवित असे. डिसेंबरमध्ये नोकरी सोडली. व्यवसाय करण्याच्या नावाखाली १० लाखाचे कर्ज काढले. तिच्या पगारावर घरात महागड्या वस्तू, आणि ऐशोआरामाचे जीवन ते जगत होते. अशात, रश्मीला जर मुल झाले तर ती नोकरी सोडून घरी बसेल. आणि पैशांचे हे चक्र बंद होईल यासाठी पतीने ५ वर्ष शारिरीक संबंध नाकारले. यादरम्यान पगाराचे ५० लाख त्यात १० लाखांचे कर्ज असे ६० लाख रुपयांवर डल्ला मारला.वडीलांच्या संपत्तीत हवा होता वाटाएवढ्यावरही न थांबता मार्च २०१८ मध्ये सासरच्यांनी १५ लाखांसाठी तिला घराबाहेर काढले. आणि वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा देण्याचा आग्रह धरला. पैसे दिले नाही तर वडीलांना मारण्याची धमकी दिली. अखेर तिने माहेर गाठले. सगळ्याच गोष्टी हाताबाहेर जात असल्याने, रश्मीनेच त्यांना धुडकारले. आणि थेट पोलिसांत धाव घेतली. तक्रारीत वरील आरोप केले आहेत. त्यानुसार, बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :विनयभंगगुन्हेगारी