... म्हणून ऊर्जा मिळाली, लवकरच जनसेवेत रुजू होणार, मिटकरींना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:06 AM2021-07-15T10:06:45+5:302021-07-15T10:08:11+5:30

रुग्णालयातील दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ते घरी गेले असून यासंदर्भात ट्विटरवद्वारे त्यांनी माहिती दिली आहे.

... So I got energy, I will join public service soon, MLA Amol Mitkari got discharge | ... म्हणून ऊर्जा मिळाली, लवकरच जनसेवेत रुजू होणार, मिटकरींना मिळाला डिस्चार्ज

... म्हणून ऊर्जा मिळाली, लवकरच जनसेवेत रुजू होणार, मिटकरींना मिळाला डिस्चार्ज

Next
ठळक मुद्देआपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज हॉस्पिटल मधुन सुखरूप बाहेर पडलोय. प्रत्येक संकटावर मात करणारं नेतृत्व पवार साहेब यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ही ऊर्जा प्राप्त झाली

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याचे वृत्त 12 जुलै रोजी समोर आले होते. त्यानंतर स्वत: अमोल मिटकरी यांनी आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही, माझी तब्येत ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमोल मिटकरी  यांनी केले होते. त्यानंतर, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

अमोल मिटकरी यांनी ट्विटरद्वारे रुग्णालयातून फोटो शेअर करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. "काल सकाळपासून माझ्या तब्येतीविषयी सुरु असलेल्या बातम्यांवर चर्चा सुरु आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी एकदम ठणठणीत असून सोशल मीडियामधून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. मला कुठलाही अर्धांगवायूचा झटका वगैरे आला नाही. माझी प्रकृती उत्तम असून सध्या अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. लवकरच जनसेवेत रुजू होईन", असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता ते रुग्णालयातून घरी गेले आहेत. 


रुग्णालयातील दोन दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, ते घरी गेले असून यासंदर्भात ट्विटरवद्वारे त्यांनी माहिती दिली आहे. 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज हॉस्पिटल मधुन सुखरूप बाहेर पडलोय. प्रत्येक संकटावर मात करणारं नेतृत्व पवार साहेब यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ही ऊर्जा प्राप्त झाली. लवकरच जनसेवेत रुजू होईल.', असे ट्विट आमदार मिटकरी यांनी केलं आहे.  

गाणं गाताना अचानक तब्येत बिघडली

राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्या विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे या काल अकोला दौऱ्यावर होत्या. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बी फार्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भाषणाचा समारोप करताना शेवटी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकड राहिली… माझ्या मनाची होतीया काहिली’ हे गाण गायला सुरुवात केली. गात असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. तेथे उपस्थितांनी त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Web Title: ... So I got energy, I will join public service soon, MLA Amol Mitkari got discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.